इगतपुरीनामा न्यूज, दि. १
दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तहसील, पंचायत समिती यांची एकत्रित आढावा बैठक आयोजित कारवाई, आमदार निधीतून दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी इगतपुरी तालुका प्रहार संघटनेने आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये ३% आरक्षणाद्वारे गाळे उपलब्ध करून द्यावेत, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तहसील, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी घ्यावे, ग्रामपंचायत आणि विविध नोकर भरती कार्यालयांत दिव्यांग बांधवांना समाविष्ट करावे, शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये ५० % सवलत द्यावी, विनाअट घरकुल मिळावे, दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना व सुविधा यांची माहिती देणारे फलक संबंधित अधिकारी यांचे नंबर टाकून प्रकाशित व्हावेत, आरोग्य विभागात दिव्यांग बांधवांना आसन व्यवस्था प्राधान्य क्रम देऊन दिव्यांग माहिती फलक लावण्यास सक्ती करावी, मासिक मिळणारे अनुदान १ ते ५ तारखेपर्यंत जमा करावेत, संंजय गांधी निराधार योजना तिमाही मिटिंगचे आयोजन करावे, बॅंक अधिकारी यांना आदेश देऊन दिव्यांग बांधवांना प्रथम प्राधान्य क्रम देण्यास सक्ती करावी, बससाठी केंद्र सरकारने UID Card वर सवलत द्यावी व स्मार्ट कार्ड रद्द करावे, आमदार निधीतून दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करावी आदी मागण्या नमूद आहेत. यावेळी इगतपुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी उपस्थित होते.