इगतपुरीनामा न्युज ता. १५ :
पिंपळगाव मोर : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील-शेवाळे यांच्या जन्मदात्री आणि सेवानिवॄत्त दिवंगत शिक्षिका स्व कुमुदिनी पाटील यांचेवर लिखित “त्यागमूर्ती कुमुदिनी” या पुस्तकाचे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते नुकतेच जिल्हा परिषद नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले.
माधुरी पाटील यांच्या मातोश्री स्व.कुमुदिनी पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा आपल्या शिक्षण कार्यपद्धति तुन उमटवलेला असुन त्यांना शैक्षणिक क्षेत्रात विविध पुरस्कार देवून त्या काळात गौरव झालेला आहे. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत त्यांची कन्या व माधुरी पाटील-शेवाळे ह्या मोडाळे शाळेत कामकाज बघत आहेत. आपल्या मातोश्री यांचे वर्षभरापुर्वी देहावसन झाल्यानंतर भावी पीढ़ीसाठी आठवणी प्रेरणादायक ठरव्यात म्हणून त्यांनी पुस्तक लिखित आपला अनुभव “त्यागमूर्ती कुमुदिनी” हे पुस्तक लिहून मांडला आहे.
प्रकाशन सोहळ्या प्रसंगी जिल्हा परिषद कृषी संवर्धन सभापती संजय बनकर, जि.प.सदस्य उदय जाधव, सिद्धार्थ बनारसे,दिपक शिरसाठ, जेष्ठ अधिव्याख्याता डायट योगेश सोनवणे,जि.प शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, मुख्याध्यापक श्रीम.चंद्रभागा तुपे, शिक्षक प्रकाश शेवाळे,अशोक खैरनार,धनराज वाणी , साहेबराव आहिरे, संकेत शेवाळे, अखिलेश बोरस्ते, राहुल खैरनार, सौ.पल्लवी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :-
नाशिक जिल्हा परिषद येथे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते त्यागमूर्ती कुमुदिनी पुस्तकचे प्रकाशन प्रसंगी मान्यवर समवेत लेखिका प्रा माधुरी पाटील-शेवाळे