इगतपुरीनामा न्यूज दि. ०८ : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिजुअल ग्राफिक्स ,डिझाईन अँड आर्टस् (वेदा) च्या वतीने आयोजित ऑनलाईन आयटी ऑलिम्पियाडचे मंगळवारी पारितोषिक वितरण होणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील आयसीटी विषयाच्या सहा शिक्षकांना ‘डॉ. इनामदार आयटी एज्युकेटर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातून हा सन्मान पटकावणारे करंजवण (ता. दिंडोरी) येथील जिल्हा परिषद शिक्षक प्रकाश चव्हाण हे एकमेव शिक्षक आहेत.
चव्हाण यांच्यासह पालघर जिल्हा परिषदेचे टेक गुरू म्हणून राज्यभर परिचित असलेले आनंद आनेमवाड, उमेश खोसे, मृणाल गंजाले, नागनाथ विभुते, शफी शेख या शिक्षकांनाही “डॉ. इनामदार आय टी एज्युकेटर अवॉर्ड” देवून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या ऑलिम्पियाडचे दहावे वर्ष आहे. यावर्षी पाच राज्यातील तीन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. डॉ. पी. ए. इनामदार, इरफान शेख, डॉ. ऋषी आचार्य, अंजुम काजळेकर आदी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत .