इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर नाशिककडून येणारा कंटेनर डिव्हाईडर तोडून जोरदार धडकला. भयानक पद्धतीने अचानक झालेल्या ह्या अपघातात चारचाकी वाहनातील ४ जण जागीच ठार झाले आहेत. ह्यातील आणखी १ युवक, कंटेनरचा ड्रायव्हर, क्लिंनर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला आहे. पावसामुळे मदतकार्यात अडचणी आल्या होत्या. अपघातग्रस्त वाहनातील ४ युवक जागीच ठार झाले असून पाचवा युवक मृत्यूशी झुंज देत आहे. आज ईदच्या सणाच्या दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आज सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान झालेल्या ह्या अपघाताची माहिती समजताच जगतगुरू नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या किमान ५ फेऱ्या झाल्या. अपघातात ४ युवक जागीच ठार झाले असून १ युवक मृत्यूशी झुंज देत आहे. हे सर्व युवक जुने नाशिक येथील चौक मंडईचे रहिवासी आहेत.
चारचाकी वाहनातील हुजेफा एजाज उस्मानी वय 31, रिझवान इक्बाल कुरेशी, वय 30, जुबेर इकबाल शेख वय 30, सोहेल अखिल पठाण वय 22 हे चौघे युवक जागीच ठार झाले आहेत. नबील सय्यद हा पाचवा युवक मृत्यूशी झुंज देत असल्याचे वृत्त आहे. कंटेनरचे ड्रायवर व क्लीनर जखमी आहेत.
अपघातग्रस्त वाहनातील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. मयत युवकांच्या चारचाकी वाहनाचा क्रमांक MH 15 CT 2404 असून कंटेनरचा क्रमांक NL 01 AA 1248 आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले होते. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पावसामुळे मदतकार्यात अडचणी येऊन दोन्ही रस्त्यांच्या बाजूला बघ्यांची गर्दी वाढली होती.
दरम्यान अपघाताची माहिती समजताच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित अपघातग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईक आणि मित्रांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. वाहनांची संख्या वाढली असून गर्दी वाढतच असल्याचे समजते.
मयत युवकांचे छायाचित्रे आणि अपघातानंतर काढलेला व्हिडिओ बघा