इगतपुरीनामा न्युज, दि. २८
इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात दोन आकड्यांवर आलेली रुग्णसंख्या उद्या किंवा परवा पुन्हा तीन आकड्यांवर जाऊन पोहोचण्याची शक्यता गडद झाली आहे. शासनाच्या लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांकडून बेफिकिरी वाढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते आहे.
आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार आज १२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. दुसरीकडे आज १५ रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस अखेर पर्यंत इगतपुरी तालुक्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ वर जाऊन पोहोचली आहे. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, अजूनही काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. आगामी काळात अशीच संख्या वाढली तर इगतपुरी तालुक्याला कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. त्यानुसार नागरिकांनी आत्मपरीक्षण करून नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.