इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील २ अल्पवयीन बेपत्ता मुलींचे मृतदेह सापडले आहेत. शेणवड बुद्रुक जवळ एका विहिरीत दोघींचा मृतदेह आढळून आले आहे. दोघींचे वय १७ ते १८ वर्षाच्या आत असल्याचे समजते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी घोटी पोलिसांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल होत तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. शवविच्छेदन करण्यासाठी मुलींचे मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एकाचवेळी २ मुलींचा मृतदेह आढळल्याने ह्या परिसरात खळबळ माजली आहे.