शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला. आज सकाळी ८ वाजेपासून  ह्या मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. गावासह परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आदींनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाण्याचे स्टॉल, वडापाव, पाणीपुरी, खाऊचे दुकान, चहा, रस, फळाचे स्टॉल, चायनीज, मन्चुरिअन स्टॉल लावले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना व्यवसायाची आवड निर्माण होण्यासाठी सर्व सामानाची खरेदी करून प्रोत्साहन देण्यात आले. मेळाव्याचे उदघाटन हभप मनोहर घोडे, उपसरपंच कैलास कडु यांनी केले. यावेळी दत्तु कोकाटे, काळु दिवटे, शिवाजी गिळंदे, मुक्तीराम कोकाटे, शिवाजी शिंदे, संजय गिळंदे, लखु कोकाटे, कुंडलिक गिळंदे, विश्वास शिंदे, कारभारी कोकाटे, चिंधु वायळ, रोहित गिळंदे, समाधान गिळंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन मिलिंद शिंदे

यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!