आजीवन अध्ययन विस्तार विभागांतर्गत आरोग्य साक्षरता व महिला सबलीकरण कार्यक्रम : कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी येथे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिप्रचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य साक्षरता व महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न झाला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा प्राचार्य प्रतिभा हिरे होत्या. सध्याच्या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली बिघडल्याने आपल्या आरोग्याची हेळसांड झाली. जीवनामध्ये आरोग्याला अनन्यसाधारण महत्व असल्याने आरोग्य साक्षरता जाणीव निर्माण करण्यासाठी डॉ. उज्वला महाजन यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रा. बी. एस. मोरे यांनी आजीवन अध्ययन विस्तार विभाग कार्यक्रमाचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन  कु. मानली गोसावी, आभार कु. पायल मोरे या विद्यार्थिनींनी केले. दुसऱ्या दिवशी महिला सबलीकरणासाठी विशाल जगताप, मीना जगताप यांनी स्त्रियांना शारीरिक सक्षम होण्यासाठी तायक्वांदो सारखे क्रीडा प्रकाराचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे सबंधित काही प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या. सूत्रसंचालन कु. योगिता भांगरे, आभार कु. सोनल गायकवाड या विद्यार्थिनींनी केले. स्टाफ सेक्रेटरी प्रा. एल. एस. अहिरे व महाविद्यालय समन्वयक यांनी मार्गदर्शन केले.प्राध्यापक वर्ग, विद्यार्थिनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Similar Posts

error: Content is protected !!