काय ती रेकॉर्डब्रेक गर्दी.. काय ते कार्यकर्ते..! जणू लकीभाऊ आजच आमदार झाले….! : इगतपुरीतुन काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांची शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल

इगतपुरीनामा न्यूज – काय ती उत्स्फूर्त रेकॉर्डब्रेक गर्दी.. काय त्या तरुण कार्यकर्त्यांची फौज.. अन तो उत्साह..जणू लकीभाऊ आजच आमदार झाले….! हा अवर्णनीय सोहळा अनुभवणाऱ्या नागरिकांनी अशा आनंददायी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने लकीभाऊ जाधव ह्या युवा चेहऱ्याला तिकीट दिलेले आहे. आज नाशिक येथे लकीभाऊ जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऐतिहासिक जनसमुदायाने स्वतःहून हजेरी लावली. विरोधक आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रस्थापितांच्या डोळ्यात आज लकीभाऊ जाधव यांनी झणझणीत अंजन घातले. आजची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहता लकीभाऊ जाधव आजच आमदार म्हणून निवडून येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.  नागरिक सकाळपासून गोल्फ क्लब मैदानावर जमून घोषणा देत लकीभाऊ जाधव यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील परिसरात ह्या समुदायाने दिलेल्या घोषणा नाशकात घुमल्या. या शक्तीप्रदर्शनावेळी वेळी महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, माकप, शेकाप आदी मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. प्रचार शुभारंभवेळी सुद्धा अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे कळते. इंदिरा काँग्रेसने लकीभाऊ जाधव यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. महाराष्ट्रासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात तरुणपिढी आणि नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवून आक्रमक नेतृत्व म्हणून काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव ओळखले जातात. काँग्रेस पक्षाने लकीभाऊ जाधव यांना उमेदवारी दिल्याने विधानसभा निवडणुकीत रंगत आली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!