लकीभाऊ जाधव – महाराष्ट्रातील युवकांचे तारणहार, इगतपुरी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन असणारे अभ्यासू उमेदवार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर युवकांच्या गळ्यातील तारणहार म्हणून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्याकडे पाहिले जाते. विविध सामाजिक प्रश्न, आरक्षणाचा लढा, युवकांचे शैक्षणिक प्रश्न, रोजगारासाठी लढा आणि विकासाची प्रचंड ओढ लकीभाऊ जाधव यांच्यात दिसून येते. २८८ मतदारसंघात त्यांची जादू असल्याने काँग्रेसनेते खा. राहुल गांधी यांनी जातीने लक्ष घालून इगतपुरी त्र्यंबकेश्वर आदिवासी राखीव मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्रात त्यांच्या माध्यमातून दुरावलेली आदिवासी मते जोडण्यासाठी ही खेळी फायदेशीर ठरणार आहे. लकीभाऊ जाधव हे आक्रमक नेतृत्व असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सुपुत्र आहे अशी भावना प्रदेश काँग्रेस नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात नेहमी व्यक्त करतात. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर लकीभाऊ जाधव हे या निवडणुकीत आमदार म्हणून नक्कीच निवडून येणार असल्याचे भाकीत केलेले आहे. मंगळवारी आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासाठी स्वतःच्या खर्चाने प्रचार करण्यासाठी युवाशक्तीचा करिष्मा सर्वांना दिसून येणार आहे. हाच दिवस त्यांच्या ऐतिहासिक विजयासाठी मोलाचा नक्कीच ठरणार आहे. 

इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील गावागावात शाश्वत विकास, भक्कम रस्ते, रोजगाराची उपलब्धता, वैतरणा धरणासाठी संपादित ६२४ हेक्टर अतिरिक्त जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना परत मिळवून देणे, हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तीनही ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून स्थानिकांना हक्काचा रोजगार देणे, उच्चशिक्षणासाठी महाविद्यालये, विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि भोजन व्यवस्था, सिंचनासाठी पाणी आणि इतर अनेक विकासाचे व्हिजन लकीभाऊ जाधव यांच्याकडे आहे. त्यांच्या कामाची वेगळी शैली पाहता ते खरोखर सगळे प्रश्न आणि समस्या सोडून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा विकास साधू शकतात. कुठलीही राजकीय आणि श्रीमंतीची पार्श्वभूमी नसलेला आणि स्वतःला इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा सुपुत्र मानणाऱ्या लकीभाऊ जाधव यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्यासाठी मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग झालेले आहे. येणाऱ्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसतर्फे लकीभाऊ जाधव हे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून निश्चितच विजयी होतील असा आत्मविश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Similar Posts

error: Content is protected !!