इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्हीही तालुक्यात विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे पक्षाचा दबदबा वाढला आहे. येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने पक्षाने सांगितलेला उमेदवार निवडून आणून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना दिवाळी गिफ्ट देऊ अशी आनंदी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी विधानसभा अध्यक्ष पांडुरंग खातळे यांनी दिली. विद्यमान आमदार हिरामण खोसकर, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, जनार्दन माळी, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पांडुरंग शिंदे, नाशिक बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, घोटी बाजार समितीचे उपसभापती संपत वाजे, संचालक दिलीप चौधरी, खरेदी विक्री संघाचे जयराम धांडे, उद्योजक प्रशांत कडू, संजय खातळे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम आदी सर्वांमुळे मतदारसंघात चैतन्य निर्माण झाले आहे. या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून पांडुरंग खातळे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.