अयोध्या सोहळा व २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी रेल्वे स्थानकात पोलिसांची करडी नजर

इगतपुरीनामा न्यूज – अयोध्या येथे सोमवारी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, दहशतवादी विरोधी पथक सज्ज झाले आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावर किंवा चालत्या रेल्वे गाडीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहुन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक मेल, एक्सप्रेस आणि प्रवाशांवर करडी नजर राहणार असून जागोजागी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. याची रंगीत तालीम शुक्रवारी इगतपुरी रेल्वे स्थानकावर घेण्यात आली. इगतपुरी रेल्वे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक गाडीसह प्रवाशांवर करडी नजर ठेवत आहेत. प्रत्येक गाडी रेल्वे स्थानकात येताच डॉग स्कॉड व बॉम्बस्फोट पथकाचे कर्मचारी गाडीची पाहणी करतांना दिसत आहेत. या मोहीमेत पोलीस निरीक्षक सचिन बनकर, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिषराम मिना, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश सोनवणे, हेमंत घरटे, संजय कपिले, सोमनाथ कराड, राजेश बागुल, प्रमोद आहाके, निरज शेंडे, अरुणा सानप, सबनीश कुमार, रागीणी मलेया, सविता कैलास सुनिल वारुळे आदी सहभागी झाले होते.

Similar Posts

error: Content is protected !!