इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट इगतपुरी शहराध्यक्षपदी आशाताई थोरात यांची निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते त्यांना नाशिक येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी आशाताई थोरात यांनी भाजप महिला तालुकाअध्यक्षपद भूषविले आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्या १५ वर्षांपासून समाज कार्य करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरोघरी पोहोचवण्यासाठी महिलांचे संघटन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इगतपुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, माजी नगरसेविका गीता मेंगाळ, माजी शहराध्यक्ष लताताई शिंदे, दीपक मावरीया, अजय जगताप, भाऊ पासलकर, सुशील भोंडवे, प्रथमेश पुरोहित, मकसुद खलिफा, प्रशांत चंद्रमोरे, वैभव खातळे यांनी थोरात यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. या कार्यक्रमाला भारती थोरात, सुलोचना डमाळे, विमल दगडे, हिरा राऊत, सुलताना शेख आदी महिला उपस्थित होत्या.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group