कवी :- जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१
दुःखाच्या डोंगराने,
अनावर झाली माता !
फुंदून फुंदून रडून देवा,
आसवे आटली आता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
विकत घेण्या श्वास,
मिळेना कुणी दाता !
प्राणवायु घेण्या देवा,
जीव तडफडत होता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
पाणी असे जीवन,
मानवा कळले आता !
श्वास असे आत्मा देवा,
कळले श्वास थांबता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
मरण झाले सोपे,
वाटते आहे आता !
जगणं नसे सोपे देवा,
घरा बाहेर पडता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
दवाखाना बील भरुन,
खिसा झाला रिता !
मेलेला जीव देवा,
घरी कसा नेऊ आता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
खच पडला देहाचा,
एक एक करता !
अग्नीडाग देण्या देवा,
कोण नेईल आता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
जन्म मरण जीवनाचा,
अर्थ कळला आता !
खुप दुःख पाहून देवा,
त्रासून गेली जनता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
हाय मोकलून थकली,
माझी जन्मदाती माता !
हताश होऊन देवा,
माझा खचून गेला पिता !!
बस झाले देवा थांबव,
घात करणे आता !!
( कवी नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक असून नेहमीच मानवी संवेदना ह्या विषयावर ते लेखन करीत असतात. )
Comments