इगतपुरीनामा न्यूज – जंगलांमधील वन्यप्राण्यांची संभाव्य शिकार व तस्करी रोखण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जंगल ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येत आहे. जंगलातील पदभ्रमंतीला प्रोत्साहन, वनक्षेत्रात नियमित गस्त या उद्देशाने इगतपुरी प्रादेशिक वन विभागाने कळसुबाई शिखर ट्रेंकिंग यशस्वी केली. नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला अशी माहिती इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी दिली. काही भागात बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या टोळ्याही सक्रिय असल्याचा संशय असून दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या इगतपुरी वनक्षेत्रात गस्त घालणे सोपे नाही. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वनक्षेत्रात आणि कळसुबाई शिखर ट्रेकिंग सारख्या गिर्यारोहण मोहिमा आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याचे केतन बिरारीस म्हणाले. कळसुबाई शिखर ट्रेकिंग उपक्रमात इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र आधिकारी केतन बिरारीस, इगतपुरीचे वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, खैरगावचे वनपाल पोपट डांगे, भंडारदरावाडीचे वनपाल प्रितिश सरोदे, कुशेगावचे वनपाल सुरेश चौधरी, वनरक्षक शरद थोरात, प्रकाश साळुंखे, गोरख बागुल, चिंतामण गाडर, गौरव गांगुर्डे, फैजअली सय्यद, मनिषा सोनवणे, मंगल धादवड, मालती पाडवी, वैशाली पासलकर, कावेरी पाटील आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी भारतीय तिरंगा ध्वज फडकावून जल्लोष व्यक्त करण्यात आला.
ह्या भटकंती दरम्यान खूप काही शिकायला मिळते. वनसंपदेबरोबरच, पक्षी निरीक्षणाच्या अनुभवातून निसर्गाचे आकर्षण वाढते. वन विभागातर्फे दरमहा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून सदृढ आणि सक्षम अधिकारी, कर्मचारी निर्माण होतील. यामुळे वन संपदा रक्षण करण्यासाठी मोलाची मदत मिळेल.
- केतन बिरारीस, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी