इगतपुरीनामा न्यूज – स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार इगतपुरी तालुक्यात स्वराज्य पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, नवनाथ शिंदे, विजय वाहुळे, पुष्पा जगताप, जिल्हाप्रमुख ( कसमादे /शहर ) आशिष हिरे , महिला अघाडी मनोरमा पाटील, रेखा जाधव, रेखा पाटील, युवा आघाडी जिल्हाप्रमुख नितीन दातीर, कामगार आघाडी दिनेश नरवडे उपस्थित होते. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे रविवारी २७ ऑगष्टला सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण हॉल मुंबई मंत्रालयाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने स्वराज्यचे शिलेदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण मुंबईमध्ये स्वराज्यचे भगवे वादळ धडकणार असल्याचा संकल्प सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला. तालुकाप्रमुख नारायण भोसले,व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख नारायण जाधव, तालुका संपर्क प्रमुख शिवाजी गायकर, उपतालुकाप्रमुख सखाराम गव्हाणे, कृष्णा गभाले, दिपक खातळे, आघाडी तालुकाप्रमुख शिवाजी काजळे, हरिष कुंदे, युवा तालुकाप्रमुख गोकुळ धोंगडे, ऋतीक जाधव, विवेक वारुंगसे, उत्तम चिमटे, कैलास गव्हाणे, बाळु सुरुडे, गणेश नाठे, अमोल धोंगडे, अजय कश्यप, सुमीत कडवे, सर्व महानगरप्रमुख, जिल्हा पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
केशव गोसावी यांनी वर्धापनदिनाचे नियोजन करतांना सांगितले की, स्वराज्य पक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शेती, सहकार, कामगार, शिक्षण, आरोग्य या पंचसूत्री प्रमाणे आपण वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा वर्धापन दिनाला होणार आहे. कार्यक्रमासाठी मुंबईकडे हजारोंच्या संख्येने स्वराज्य पक्षाचे शिलेदार घेऊन जायचे आहे. जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये जे पदाधिकारी चांगले काम करत आहे त्या सर्वांचे अभिनंदन केले. स्वराज्य हे छत्रपतींचे आहे. १८ पगड जातींचे आहे असे सांगत आपल्याला समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी एकजुटीने लढायचे असल्याचे सांगितले. सर्व पदाधिकाऱ्यांनी सोबत येणाऱ्या प्रत्येक बांधवांची यादी बनवून प्रवासाचे अचूक नियोजन योग्य वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत वाडीवऱ्हेचे ग्रामपंचायत सदस्य रोहिदास टिळे यांना शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख, किरण धांडे यांना उपतालुकाप्रमुख, समाधान मते यांना युवा उपतालुकाप्रमुख, शालुताई हंबीर यांना महिला आघाडी तालुका सरचिटणीस या पदावर नवीन नियुक्तीचे पत्र देण्यात आले.