इगतपुरीनामा न्यूज – पश्चिम भाग नाशिक वन विभागाअंतर्गत इगतपुरी प्रादेशिक वनक्षेत्रात खैरगाव परिमंडळातील काळुस्ते येथील संयुक्त वनव्यस्थापन समिती काळुस्ते अंतर्गत संरक्षित वनांचे क्षेत्रालगत गावातील आदिवासी लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने स्वयंपाकाचा गॅस व बायोगॅस, दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीच्या संरक्षणासाठी प्रोत्साहन देणे या योजनेतुन नवीन एलपीजी कनेक्शन सोबत २ सिलेंडर प्रति लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पश्चिम भाग नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, खैरगावचे वनपाल पोपट डांगे, काळुस्तेच्या वनरक्षक मंगला धादवड, वनरक्षक काळुस्ते यांनी लाभार्थ्यांना एलपीजी गॅस वाटप केले. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना वनसंरक्षणाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि वन्यजीवांबद्धल जनजागृती करण्यात आली.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group