इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येक महिलेला आपल्या हक्काची, अधिकाराची, समस्याची जाणीव होण्यासाठी शिबिर उपयुक्त आहे. महसूल विभागाकडून महिलांसाठी विधवा, निराधार योजना, शासन आपल्या दारी योजना, रेशनकार्ड आदी योजना राबविणार असून पंधरा दिवसाला आढावा बैठक घेणार आहे. प्रलंबित कामे मार्गी लावून सर्व घटकांपर्यंत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले. इगतपुरी पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.
महिलांमध्ये भीती अडचण असेल तर त्यांच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असल्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी लता गायकवाड, सह. गटविकास अधिकारी अमित भुसावरे, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, कृषी विभागाचे सुभाष गोसावी, नितीन गांगोडे , भूमी भूमिलेख विभागाचे भाबड, तालुका संरक्षण अधिकारी सुनील वाघ, पशुसंवर्धन अधिकारी प्रदीप कागणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध विभाग प्रमुखांनी व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली आडके, प्रतिभा बर्डे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी केले. प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, मातृत्व अनुदान, मानवविकास आदींची माहिती देण्यात आली. विस्तार अधिकारी संजय मोरे, मिलिंद शिंदे, सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.