कोरोनाची दुसरी लाट संसर्गापेक्षा अभूतपूर्व भीती आणि गैरसमज यांच्या आधाराने लोकांचा बळी घेत आहे. कोरोना आजाराने मृत्यूचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं…असं मानणारे हजारो कोरोनाबधित रुग्ण नाशिकच्या डॉ. अतुल वडगावकर यांनी भयमुक्त करून कोरोनामुक्त केले आहेत. महामारी आल्यापासून आजपर्यंत एकही रुग्ण दगावला नसल्याने डॉ. वडगावकर यांना साक्षात देवदूत म्हटलं तरी अजिबात वावगे ठरणार नाही. अतिशय अत्यल्प आणि साध्या सोप्या औषध आणि सल्ल्याने त्यांची उपचार पद्धती हजारो रुग्णांना जीवदान देणारी ठरली आहे. त्यामुळेच आजच्या भयानक परिस्थितीत अगदी पहाटेपासून कोरोना बाधित लोकांची अभूतपूर्व गर्दी डॉ. वडगावकर यांच्या विजय नर्सिंग होममध्ये दिसून येते. आपल्या टीमला रुग्णसेवेसाठी कटिबद्ध आणि कार्यक्षम बनवून ते हजारो रुग्णांचा श्वास बनले आहेत.
– श्री. भास्कर बबन सोनवणे
संपादक, इगतपुरीनामा न्यूज पोर्टल
भीतीचे सावट आणि दहशत
कोरोनाचे रोज वाढणारे भलेमोठे आकडे, ऑक्सिजन टंचाई, रेमडीसीविरचा घोळ, बेडचा गोंधळ, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर, अँटीजेन चाचणी यांसह सोशल मीडिया, टीव्ही वृत्तपत्रातील कोरोनाने व्यापलेली जागा यामुळे सामान्य माणूस कधी नव्हे तेवढ्या भीतीच्या दहशतीत वावरतो आहे. सामान्य आजार झाला तरी लक्षणे पाहता कोरोना झाला का ? ह्या संशयाने माणूस पछाडला जातो. अद्यापही लोकांचा कोरोना बाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नसल्याने भीतीमध्ये अधिकच वृद्धी होते.
हजारो टनाच्या बोझ्याखाली आरोग्य व्यवस्था
खासगी सरकारी हॉस्पिटल, तिथली सेवा, डॉक्टर्स, नर्सेस, इंजेक्शन, चाचण्या यांच्याविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रतिमा ढासळून गेली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सर्वच आरोग्य संस्थाबाबत लोकांच्या मनात सध्याच्या काळात भीतीयुक्त प्रतिमा निर्माण झाली आहे. ह्यामुळे कधी नव्हे तेवढ्या हजारो टनाच्या बोझ्याखाली ही आरोग्य व्यवस्था आली आहे.
भयाचा अंधार दूर करणारे अवलिया
अशा भयानक अंधकारमय वातावरणात नाशिकमध्ये लोकांच्या आशेचा किरण डॉ. अतुल वडगावकर ठरले आहेत. खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य माणसांपासून ते शहरी भागातल्या सुस्थितीतील कोरोना बाधित रुग्ण डॉ. वडगावकर यांच्याकडे येतात. पहाटे पासून डॉ. वडगावकर यांचा दवाखाना सुरू होतो. रुग्णांशी आपुलकीने चर्चा करून त्याला पहिल्या टप्प्यात भयमुक्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. यासह रुग्णाला आवश्यक माहिती आणि मदत मिळेल असे व्यवस्थापन ह्या ठिकाणी करून ठेवलेले आहे. लोकांच्या मनात असलेले भीतीचे भूत उतरवलं की पुढील काम सुरू होते.
कोरोनाला हरवण्याची दृढनिश्चयी उपचार पद्धती
तपासणीनंतर संबंधित रुग्णाच्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या चाचण्या केल्या जातात. त्यानुसार संबंधित रुग्णावर करण्यात येणारी औषधयोजना तयार केली जाते. औषधोपचार सुरू केल्यानंतर त्या रुग्णाला स्वतःच्या घरी विलगीकरणं करण्याचा सल्ला दिला जातो. ह्या काळात घ्यावयाची औषधे, आहार व्यवस्थापन, जीवन शैली, व्यायाम आदींबाबत रुग्णाला मनापासून समजून सांगितले जाते. डॉ. अतुल वडगावकर यांच्या शैलीदार बोलण्यासह उपयुक्त औषधयोजनेमुळे भीतीमुक्त झालेला रुग्ण निम्मा बरा येथेच होतो. त्यांनतर घरच्या वातावरणात तो पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहत नाही. डॉ. वडगावकर यांच्या उपचार पद्धतीने आतापर्यंत हजारो कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत कोरोनामुक्त झाले असल्याचा इतिहास आहे. हा सर्व निरामय जीवनाचा इतिहास अर्थात रुग्णांचे रेकॉर्ड डॉ. वडगावकर यांच्याकडे उपलब्ध आहे.
नागरिकांना आवाहन
कोणतीही परिपूर्ण माहिती न घेता उठसुठ बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन आदींसाठी धावपळ करू नका. सध्या आरोग्य व्यवस्थापन प्रचंड तणावाखाली आहे. जनसेवक, लोकप्रतिनिधी, यंत्रणा ह्यांची मर्यादा संपली आहे. अशा काळात डॉ. अतुल वडगावकर यांचे विजय नर्सिंग होम हा अत्यंत उपयुक्त पर्याय वापरायला अजिबात अडचण नाही. हजारो रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा इथला इतिहास आहे. एकही रुग्ण दगावला नसल्याचा डॉ. वडगावकर यांचा लौकिक आहे. सर्वांना परवडेल आणि आनंदाने करता येईल इतका अत्यल्प खर्चात कोरोनामुक्त व्हायला तुम्हाला डॉ. अतुल वडगावकर या देवदूतची भेट घ्यायला लागेल.
लोकप्रतिनिधींचा अनुभव
इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे वर्षभरापासून शेकडो रुग्णांना विविध प्रकारे मदत करीत आहेत. ते स्वतः डॉ. वडगावकर यांच्याकडे लोकांना संदर्भित करतात. श्री. बोडके म्हणतात की कोरोनामुक्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं आणि त्यांच्या कुटुंबाचं सुखद हसू म्हणजे डॉ. अतुल वडगावकर हे देवदूत असल्याचा साक्षात्कार घडवते. संसर्गापासून दूर राहण्यासाठी श्री. बोडके हे नेहमीच डॉ. वडगावकर यांना भेटतात. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर सध्या कोरोना बाधित आहेत. यांनीही डॉ. अतुल वडगावकर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरू केला आहे. श्री. खोसकर यांनी हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केल्याबद्धल डॉ. अतुल वडगावकर यांचे मतदार संघाच्या वतीने आभार मानले आहेत.