इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यासाठी सलग काही दिवस अत्यंत आशादायक बातमी घेऊन आले आहेत. आजही सकारात्मक बातमी आली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुकाभरात 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह आज 30 नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले. आता फक्त 237 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी सर्वतोपरी काळजी आणि नियमांचे पालन केल्यास आपल्या तालुक्याची वाटचाल लवकरच कोरोनामुक्त तालुका अशी असेल असे आशावाद डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.
उभाडे येथे एकाच दिवशी १६९ नागरिकांना लसीचा डोस ; उभाडे गाव कोरोनामुक्त
पिंपळगाव मोर ( निलेश काळे ) : कोरोनाच्या वाढत्या लाटेबरोबरच शहरी भागासह ग्रामीण भागात लसीकरणास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत उपकेंद्र उभाडे येथे शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित केले होते. उभाडे गाव यापूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असताना आजच्या परिस्थितीत हे गाव कोरोनामुक्त झालेले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभाडे येथे शिबिराचे उदघाटन सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरात पिंपळगाव मोर, उभाडे, उंबरकोन येथील ४५ वर्षांवरील तब्बल १६९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरण कामी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोळी, डॉ. चित्ते, आरोग्य सहाय्यक लॉड्रीक, आरोग्य सहाय्यक आर. एस. आवारी, बी. आर. गायकवाड, व्ही. डी. गुजर, ए. एल. गवळी, बी. आर. पाटील, एस. एस. दिंडे, डी. जी. पराडके तसेच आशा कर्मचारी व शिक्षक वृंद उभाडे ह्यांनी शिबीरात योगदान दिले.
कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.