घोटी शहर नाभिक युनियन अध्यक्षपदी किरण कडवे यांची निवड

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – घोटी शहर नाभिक युनियनच्या अध्यक्षपदी किरण कडवे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे तालुक्यातून स्वागत करण्यात आले. स्तरातून होत आहे. नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज मंदिरात निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्राची जाण असलेले घोटी येथील  किरण कडवे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. नाभिक समाजातील प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी योग्य व्यक्तीची सार्थ निवड झाल्याने त्यांच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उपाध्यक्षपदी गणेश रायकर, गणेश आंबेकर, सरचिटणीसपदी देवदास रायकर, सहचिटणीस रवींद्र जाधव, खजिनदार भूषण डाके, गणेश शिंदे, सल्लागार रामु साखला,  सदस्य रोहित चौधरी, किशोर रायकर, रशीद खलिफा, संदीप कुंवर, महेश कोरडे, गणेश शिंदे यांची निवड झाली. माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांच्या एकजुटीने अध्यक्षपदाची सूत्रे हातात आली. समाजाचा विकास आणि उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळाली. नाभिक समाजाचा विश्वास सार्थ ठरवेन असे नवनियुक्त अध्यक्ष किरण कडवे यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे  अध्यक्ष एकनाथ कडवे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर यशवंत कडवे, अशोक सूर्यवंशी, नारायण शिंदे, कोषाध्यक्ष भानुदास जाधव, पंढरी आंबेकर, मच्छिंद्र कोरडे, मिथुन बिडवे, रामदास कडवे,  वाल्मीक रायकर, संजय कोरडे, सोमनाथ कोरडे, अमोल कडवे, सूर्यकांत कोरडे, रमेश रायकर, प्रकाश कोरडे, वैभव कोरडे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

error: Content is protected !!