इगतपुरीनामा न्यूज दि. २ – नव्या वर्षाची सुरुवात छत्रपतींच्या विचारांनी करावी या उद्देशाने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज रुद्राभिषेक व पालखी सोहळा पट्टा किल्ला येथे आयोजित केला जातो. घराघरात छत्रपतींच्या विचारांचा मावळा घडावा, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुद्राभिषेक पट्टा किल्ला येथे पार पडल्यानंतर भवानी माता मंदिर गोंदे दुमालाकडे पालखी प्रस्थान करते. टाकेद, धामणगाव, साकुर, नांदगाव बुद्रुक, वाडीवऱ्हे आदी गावांमधून आलेल्या पालखीचा शेवट गोंदे येथे होतो. यावर्षी मठाधिपती हभप माधव महाराज घुले यांनी पालखी दर्शन घेतले.
हिंदूरत्न हभप धर्मराज महाराज यांनी कीर्तनात इतिहासाची अनेक पाने उलगडली. युवकांना व्यसन आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी छत्रपतींच्या विचारांशी जोडले जाण्याचा मंत्र त्यांनी दिला. यावेळी स्वराज्य संघटनेचे डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी स्वराज्याच्या दोन माऊलींच्या कहाणीचा उल्लेख करत चांगल्या संगतीत राहून आईने मुलांना छत्रपतींचे संस्कार कसे द्यावे याबाबत मार्गदर्शन केले. म्हणून छत्रपतींचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांचे मार्गदर्शन स्वराज्य संघटनेमार्फत आयोजन केले आहे अशी माहिती डॉ. रुपेश नाठे यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनीही आपले मत व्यक्त केले. हरिश्चंद्र नाठे, तुकाराम सहाणे, सुनील जाधव, रतन बांबळे, शरद हांडे, गजीराम नाठे, परशराम नाठे, संदीप पागेरे, रमेश नाठे, गणेश नाठे, जयेश नाठे, मयूर नाठे, सोहम धांडे, ऋषीकेश भोसले, मयुर भोसले,ओम चौधरी, अजय कश्यप, पंढरीनाथ महाराज सहाणे, तुषार शिंदे, जालींदर पागेरे, किरण पागेरे, विकास मुसळे यांच्यासह नागरिक हजर होते.