जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – समग्र शिक्षा पंचायत समिती इगतपुरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटी मुले नं. १ वं २  यांच्या संयुक्त विद्यमाने समता सप्ताह निमित्ताने दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. गटशिक्षणधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी, निलेश पाटील विस्ताराधिकारी अशोक मुंढे, कैलास सांगळे, घोटीचे केंद्रप्रमुख योगेश भामरे, मुख्याध्यापक जहीर देशमुख, पोपट खाडगीर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरून जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रवीण जाधव, जिल्हा समन्वयक विजया अवचार, सुरेखा पाबळकर उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा समनव्यक विजया अवचार व सुरेखा पाबलकर यांनी दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना दिव्यांग सप्ताह निमित्त मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थी व पालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.  दिव्यांग विद्यार्थी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चमचा लिंबू, संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे, वैयक्तिक नृत्य या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सन्मानित केले. दिव्यांग सप्ताह निमित्त नेत्र तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धा यशस्वितेसाठी तालुका विशेष तज्ञ स्मिता खोब्रागडे, उत्तम आंधळे, विशेष शिक्षक बाप्पा गतीर, संदीप शिरसाठ, योगेश शिंदे, वनिता तपकिरे, नीलम पवार, सर्व शिक्षक, पालक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत वाघ यांनी तर आभार बाप्पा गतीर यांनी मानले.

Similar Posts

error: Content is protected !!