इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पृथ्वी घटकांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी ७५ लाख आणि नाशिक विभागस्तरीय प्रथम कामगिरीसाठी ५० लाख असे तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस घोषित झाल्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, आनंद पिंगळे, दीपक चाटे, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, विस्ताराधिकारी संजय पवार, पृथ्वीराज परदेशी, ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांनी ग्रामपंचायतीला मार्गदर्शन केले होते. बक्षीसाची घोषणा होताच गावकऱ्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत.
माझी वसुंधरा अभियान २.० मागील वर्षी कमी लोकसंख्या गटातून पृथ्वी या घटकांतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार व नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावला होता. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मुंबई येथे गौरविण्यात आले होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या निसर्गाशी आधारित पंचत्वावर “माझी वसुंधरा अभियान” सुरु आहे. शिरसाठेचे सरपंच गोकुळ नामदेव सदगीर, उपसरपंच शितल विलास चंदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर कारभारी सोपनर, तारा गणेश तेलंग, रमेश शिद, अलका दोंदे, गांगुर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी भावराव गांगुर्डे, संपत सप्रे, ग्राम रोजगारसेवक भास्कर सदगीर, संगणक परिचालक म्हसणे, जि. प. शाळा शिरसाठे, सप्रेवाडी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, महिला स्वयंसहायता समुह सीआरपी सुनीता ढोन्नर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिरसाठे ग्रामपंचायतीने केलेल्या उच्चतम कामगिरीबद्दल इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.