सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामांना मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी तालुक्यातील सतरा गावांत कामांचे भूमिपूजन मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तालुक्यात ६५ कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत एकाच वेळेस सुरू करण्यात आली हवं. या कामांचे उदघाटन इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर, गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे, सहाय्यक गटविकास अधिकारी पाठक, विस्ताराधिकारी बाळू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते. हातलोंढी, कोणे, मुरंबी, साप्ते, ठाणापाडा, मेटचंद्राची , कोटंबी, चिंचवड, पेगलवाडी नाशिक, रायते, खैरायपाली, वेळुंजे, मुलवड ,वेळे, गावठा, खरवळ, तळवडे त्र्यंबक या सतरा गावांत काम सुरु होऊन १८ हजार ९३४ मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group