खवय्यांच्या पसंतीला उतरलेला हरी ओम साई ढाबा : अस्सल शाकाहारी जेवणासाठी महामार्गावरील अव्वल ठिकाण

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 21

प्रचंड जिद्द, स्वप्न, प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर यशाचा मार्ग सुकर होतो. अपार कष्ट करून मिळवलेले यश मेहनतीची ग्वाही देणारे ठरते. यानुसार गोंदे दुमाला येथील हरी ओम साई ढाब्याचे संचालक अकबर रशीद पठाण यांनी 12 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या हॉटेलला मिळणारी पसंती लोकांच्या प्रतिसादाने वाढत आहे. “जरी असतील हॉटेल कितीही..अशी चव मिळणार नाही कुठेही” याप्रमाणे गोंदे दुमाला येथे मुंबई आग्रा महामार्गा जवळ हरी ओम साई ढाबा अधिकच लोकप्रिय होत आहे. मुंबई, नाशिककडे जात असताना अनेक खवैय्या परिवाराची पावले हरिओम साई ढाब्याकडे वळतात. थायसनकृप कंपनी समोर असलेला लोकप्रिय हरी ओम साई ढाबा खवय्यांचे लोकप्रिय ठिकाण ठरले आहे. येथे अनेक भोजनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. हॉटेलचे संचालक अकबर रशीद पठाण हे ग्राहकांना जेवणाच्या चांगल्या सुविधा देत असल्याने अनेक ग्राहकांना या हॉटेलला पसंती देत आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या स्वादिष्ट जेवणाने हे हॉटेल अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. अस्सल शाकाहारी मराठमोळे  उत्कृष्ट चवदार जेवण मिळत असल्याने अनेकांची वर्दळ वाढली आहे.

अनेक कुटुंबाची गर्दी, वर्दळ नेहमीच हरीओम साई ढाब्यात असते. पनीर राजवाडी, पनीर टिक्का मसाला, शेवगा हंडी, पनीर टिक्का ड्राय, दूध शेवभाजी, पनीर ब्लॅक टिन, ज्वारी, नागली, तांदळाच्या 5 प्रकारच्या भाकरी, कोथींबीर पराठा, ठेचा पराठा आदी रुचकर जेवण मिळते. हरि ओम साई ढाब्यावरील सर्वोत्तम जेवणाची चव एकदा चाखल्यास नेहमी ठिकाणी कायमचे ग्राहक व्हाल. म्हणून एकदा भोजनाची चव घेण्यासाठी अवश्य भेट द्यायला हवी. आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आनंद देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. मनापासून आवडणारे पदार्थ लोकांना भावतात. एकदा इथे आलेला ग्राहक दुसऱ्यांदा आवर्जून इथेच येतो हे आमचे भाग्य आहे असे मत संचालक अकबर रशीद पठाण यांनी व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!