स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

कवयित्री – आनंदी गावंडा, दरेवाडी, ता. इगतपुरी

स्वातंत्र्याला 75 वर्षे झाले देशवासीयांनो,
अमृत महोत्सव साजरा करूया आनंदाने,
घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं, घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं !

भगतसिंग राजगुरू सावरकर,
थोर क्रांतिकारी होऊनी गेले फार,
त्यांच्या स्मृती ठेवू मनामध्ये तेववून!
घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं, घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं !

वीर जवानांची करुनी आठवण,
हृदयी करू त्यांच्या कार्याची साठवण,
भारत मातेचे सुपुत्र सारे मिळून!
घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं, घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं !

जगी तिरंगा माझा महान,
“आनंदी “ने गीत गायले आनंदानं,
करुनी तिरंग्याला शत: शत: नमन!
घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं, घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं !

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!