सामाजिक वनीकरण विभागातर्फे धामणगाव बिद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

माध्यमिक विद्यालय धामणगाव व प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव या विद्यालयांत सामाजिक वनीकरण विभाग, वनपरिक्षेत्र-इगतपुरी यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी वनक्षेत्रपाल हिरालाल चौधरी, वनपाल आर. के.अहिरे, एस. टी. माटेकरी, एन‌. आर. सरोदे, वनरक्षक व्ही. बी. पासलकर, वृक्षमित्र प्रभाकर गोडे,इको-इको फाउंडेशन नाशिक यांचे संचालक, सर्पमित्र अभिजीत महाले, वन्यजीव संरक्षक शंतनू पवार, कु.पूजा लठ्ठा व हॉंगकॉंग येथून भारतात निसर्गअभ्यास करण्यास आलेले केनीथ च्यांग हे उपस्थित होते.

वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण विषयक घोषणा दिल्या. वृक्षलागवड व वृक्षसंगोपन बाबत जनजागृती करण्यात आली. विद्यालयांच्या प्रांगणात सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एस. आव्हाड, व्ही. डी. बैरागी, डी. व्ही. अहिरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक जी. व्ही. लहामगे यांनी पर्यावरण गीताचे सादरीकरण केले. त्यानंतर हॉंगकॉंग येथील परदेशी पाहुणे केनीथ च्यांग यांनी दुभाषिकाच्या मदतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन नितीन इंगळे यांनी केले. सर्पमित्र अभिजीत महाले यांनी विद्यार्थ्यांना स्लाईड-शो द्वारे सापांची माहिती, ओळख व सापांविषयी असलेली अंधश्रद्धाचे निर्मूलन तसेच प्रथमोपचार यांविषयी माहिती दिली. आभार एस. एन. खैरनार यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!