इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
घोटी येथील कै. राजाराम ( राजूनाना ) अनाजी काळे यांचे गुरुवार दि. २५ नोव्हेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले. महात्मा फुले समता परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवाभाऊ काळे यांचे ते वडील होत. त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार दि. २६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता घोटी येथे दारणा तिरी होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.