इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत सक्रिय असणाऱ्या 311 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गावोगावी नागरिक धास्तावले असून अनेकांना किरकोळ लक्षणे असल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केले जाताहेत. इगतपुरी सारख्या निसर्गसंपन्न तालुक्यात कोरोना महामारीमुळे धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झालेली असल्याचे बोलले जाते आहे.
कार्यक्रमांत आणि बाजारात विनाकारण गर्दी करणे, सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ, दशक्रिया विधीमध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, मास्क व्यवस्थित न वापरणे आदी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याची चर्चा आहे.
इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत एकूण सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची 311 वर गेली आहे. असे असले तरी अंगावर लक्षणे काढणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी असल्याचा अनेकांना संशय आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घरोघरी तपासणी व्हावी अशी जागरूक नागरिकांची अपेक्षा आहे. “कोरोना साथ संपुष्ठात आली असे समजून सार्वजनिक कार्यक्रमाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. सोशल डीस्टन्सचा लोकांनी बोजवारा उडविला आहे. मास्क न वापरता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी सारखी असलेली कोरोनाची भीती कमी झाली आहे. त्यामुळेच कोरोना वाढला आहे.” अशी चर्चा जागरूक नागरिक करीत आहेत.
■ कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.