इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
लायन्स क्लब मुंबई यांच्या वतीने व विनोद पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषद शाळा पिंप्री सद्रोद्दिन येथील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी तीन वह्या, एक चित्रकला वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर इत्यादी साहित्याचे कीट यावेळी देण्यात आले. ३० हजारांपेक्षा जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य मिळाल्याने पालक आणि शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या वतीने कार्यक्रमात गणवेशांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमजद पटेल, उपाध्यक्ष रेश्मा पटेल, प्रकाश उबाळे, संतोष पाटेकर, नितीन उबाळे, अवचित उबाळे, मुख्याध्यापिका शोभा ढोले आदींसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्ती नाठे यांनी केले. विलास उबाळे, सुखदेव ठाकरे, योगिता हाके यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.