अतिदुर्गम वाडी बदल रही हैं…चांगुणा आगीवले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

गरिबीचे चटके सोसत असतांना रोजचा दिवस अंगमेहनत आणि मजुरीने सुरू होतो. वर्षानुवर्षाच्या अज्ञानामुळे जन्माची तारीखही धड माहीत नाही. वीतभर पोट आणि मुलाबाळांच्या गराड्यात वाढदिवस कधी होऊन जातो हे सुद्धा समजत नाही. यामध्येच वाडीला रस्ता नाही, फोनला नेटवर्क नाही. वाढदिवस काय असतो याबद्दल वाडीच्या गावकऱ्यांना कधी माहितीही नाही. अशा परिस्थितीत आज अतिदुर्गम असणाऱ्या धामडकीवाडी गावात ग्रामपंचायत सदस्या चांगूणा बबन आगिवले यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा झाला.  जिव्हाळ्याच्या प्राथमिक शाळेत मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा करण्यात आला. वाडीतील महिलांनी चांगुणा आगिवले यांना औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खाऊचे वाटप करण्यात आले. चांगुणा बाई यांना वाढदिवसानिमित्त प्रमोद परदेशी यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बबन आगिवले, राजू पारधी कसारा, गोकुळ आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले, खेमा आगिवले, साळीबाई आगिवले, धोंडीबाई आगिवले व वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!