इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने औपचारीकपणे संविधान स्विकारले. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकुन दोन वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. आताच्या संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे असे प्रतिपादन हरसुलचे उपसरपंच राहुल शार्दुल यांनी केले.
आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डाॅ. भिमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता.त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतिक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. यावेळी काँग्रेसचे नेते विनायक माळेकर यांनी हरसुल येथील आंबेडकर नगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर उपस्थितांनीही पाठोपाठ सामुहिक वाचन केले. यावेळी काँग्रेसचे नेते विनायक माळेकर, हरसुलचे उपसरपंच राहुल शार्दुल, युवा नेते मिथुन राऊत, हिरामण गावित, माजी उपसरपंच अकलाख शेख, काँग्रेसचे जेष्ठ नेते वामन खरपडे, हरसुल ग्रामपंचायतचे माजी सदस्य बाळा महाले, अशोक लांघे, युवा नेते प्रकाश जाधव, योगेश आहेर, अंबादास बोरसे, रघुनाथ गांगोडे, भाऊराज धनगर, सुरेश शेंडे, प्रकाश बोरसे आदी उपस्थित होते.