इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागांतील सामजिक, राजकीय क्षेत्रात हिरारीने सहभाग घेऊन गोरगरीब, होतकरू यांचा पंचप्राण असणारे युवानेते म्हणून मिथुन भाऊ राऊत ओळखले जातात. गोरगरिबांच्या समस्या सोडवून त्यांच्या सुखदुःखात कायमच सहभागी होणाऱ्या मिथुनभाऊ राऊत यांच्या वाढदिवसाचा तालुकाभर डंका असतो. मात्र ह्यावर्षी कोरोनाचा कहर वाढल्याने शिवसेनेचे युवानेते मिथुन भाऊ राऊत यांचा उद्या दि. १९ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला आहे. स्वतः मिथुनभाऊ राऊत यांनी कोरोनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडिया आणि फोनद्वारे शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या संपुर्ण जगात कोरोना वायरसचा धुमाकूळ सुरु आहे. देशात अनेक धार्मिक स्थळे, माॅल, चित्रपट गृहे, अनेक पर्यटन स्थळे, महाविद्यालये असे अनेक गर्दीचे ठिकाणी जाणे बंद करण्यात आले आहे. तसेच शासनाने पारित केलेल्या परिपत्रकांचे पालन करत याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन शिवसेनेचे युवा नेते मिथुनभाऊ राऊत यांनी यावर्षीचा वाढदिवस साजरा न करण्याचा संकल्प केला आहे.वाढदिवसाला खर्च होणारी रक्कम आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी देणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी फक्त सोशल मीडिया आणि फोन कॉल यावर संपर्क साधून कोरोना लढ्याला योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
■ सर्वांना नम्र विनंती आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. तरी आपण सर्वांनी स्वतःची आणि परिवाराची योग्य ती काळजी घ्यावी. घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती तसेच आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी. आपण सर्व सदस्य ज्ञानी, अनुभवी आणि समजदार आहातच. माझा वाढदिवस ह्यावर्षी साजरा न करण्याचे मी ठरवले आहे. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की सर्वजण सुखी, आनंदी, समाधानी व आरोग्यमय राहोत.- मिथुनभाऊ राऊत, युवानेते हरसूल