कार्यकर्त्यांचे पाठीशी असणारे बळ आणि सत्याच्या विजयामुळे निर्दोष मुक्तता : छगन भुजबळ : नाशिक जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर भुजबळांचे दणदणीत स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या इगतपुरीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी विजयी थाटात जोरदार स्वागत केले. छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर ते नाशिक जिल्हयात कधी येतील याची उत्सुकता कार्यकर्ते यांच्यात होती. आज सकाळपासुनच इगतपुरी शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गवर स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. भुजबळांचे आगमन होताच अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

स्वागताला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदन प्रकरणी झालेली निर्दोष मुक्तता कार्यकर्त्यांचे पाठीशी असणारे बळ आणि सत्याचा विजय यामुळे झाला असल्याचे मी मानतो. स्वागत करणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत असे ते शेवटी म्हणाले. भुजबळ यांचे स्वागत करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सुनील वाजे, वसीम सय्यद, संजय खातळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, नारायण वळकंदे, महेश शिरोळे, दीपक गायकवाड, अनिल पढेर, मदन कडू, पोपट भागडे, मनीष भागडे यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!