इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
आदिवासी नागरिकांमधून पात्र लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ देण्यात आला. लहांगेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य गोविंद डगळे यांच्या मार्गदर्शनाने आज मुंढेगाव येथे खावटी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आगामी काळात लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोविंद डगळे यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यात रोख रक्कम रुपये २ हजार जमा झाले आहेत. उर्वरित २ हजार रुपयांचा खावटी किराणा वस्तु रुपात देण्यात आला. शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा मुंढेगाव येथे ह्या परिसरातील एकुण ५०४ लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी लहांगेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य गोविंद डगळे, शाळेचे मुख्याध्यापक तनवीर जहागिरदार, विस्तार अधिकारी चंदनशिवे, शिक्षक नरहरी सोनार, दिनकर डगळे, शाम अंडे, धोंडीराम तर्हे, लक्ष्मण वाघ तसेच सर्व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.