इगतपुरीनामा न्यूज – लोकशाही स्थिरावण्यासाठी पूरक असणारे पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रक्षक आहेत. त्यांच्या जागरूकतेमुळे जनसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी तत्पर व्हायला मदत होते. इगतपुरी तालुक्यातील पत्रकार चांगल्या कार्यामुळे गौरव करण्यास पात्र आहेत. असे चांगले काम करणाऱ्या सर्व लेखणीच्या शिलेदारांचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन नाशिक महानगर पालिकेचे माजी सभागृहनेते भाजप नेते दिनकर पाटील यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांना दिनकर पाटील यांच्यातर्फे कपड्यांचे वाटप झाले. नेहमी चांगले काम करणारे पत्रकार देशाच्या शाश्वत विकासाला उपकारक ठरत असून यापुढे यांच्यासाठी दिशादर्शक योगदान देऊ असे श्री. पाटील म्हणाले. इगतपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी ३५ वर्षाच्या सेवाकाळात फक्त इगतपुरी तालुक्यातील पत्रकारांनी सर्वोत्तम सहकार्य देण्यासाठी पत्रकार झटले आहेत. चांगले काम समोर येत असतांना आम्ही अधिकारी चुकीचे करीत असेल तर निडरपणे पत्रकारांनी लेखणीद्वारे वाच्यता करायला पाहिजे. इगतपुरीतील पत्रकारांचा सन्मान करतांना अत्यानंद होतो असे मनोगत व्यक्त केले.
महात्मा गांधी हायस्कुलचे प्राचार्य अरुण गायकवाड, मिडीया अँकर तथा सिने सिलेब्रिटी अश्विनी पुरी यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते अजित पारख यांच्यातर्फे सर्वांना राजस्थानी पगडी देण्यात आली. कार्यक्रमावेळी सुमित क्रीपलानी, आली शेख, उद्योजक योगेश मालपाणी, आदिवासी नेते अनिल गभाले, श्री जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, दिनेश लुणावत, गजानन गोफणे, प्रसाद चौधरी, सुधीर कांबळे, रहीम शाह, प्रमोद व्यास, रामचंद्र नायर, शांताराम रिखे, योगेश चांदवडकर आणि जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी हजर होते. पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे, सरचिटणिस राजेंद्र नेटावटे, उपाध्यक्ष राजु देवळेकर, कार्याध्यक्ष शैलेश पुरोहित, संघटक सुमित बोधक, उपाध्याक्ष वाल्मीक गवांदे, कोषाध्यक्ष गणेश घाटकर, सह संघटक भास्कर सोनवणे, सदस्य विकास काजळे, संदीप कोतकर, सुनिल पहाडीया, एकनाथ शिंदे, लक्ष्मण सोनवणे, समाधान कडवे, शरद धोंगडे, ओंकार गवांदे उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व पत्रकारांना सन्मानित करून पत्रकार दिन साजरा केला. प्रास्ताविक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी केले तर पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष राजु देवळेकर यांनी आभार मानले.