गतिमान शाश्वत ग्रामविकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या संकल्पनेतील नियोजन प्रभावी ठरणार – आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

इगतपुरीनामा न्यूज – गतिमान पद्धतीने शाश्वत ग्रामविकास साध्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्या संकल्पनेतील सूक्ष्म नियोजन अतिशय परिणामकारक आहे. त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी माझ्याकडील संपूर्ण कौशल्य पणाला लावून इगतपुरी तालुक्याला राज्याच्या नकाशावर दिमाखात झळवण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील सरपंचांना नियमित मार्गदर्शन केले जाईल. येणाऱ्या काळात स्वयंपूर्ण गावे उभी करून गोरख बोडके यांचे स्वप्न पूर्ण करूया असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदाचे लोकप्रिय सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी इगतपुरी येथे केले. काही दिवसापूर्वी गोरख बोडके यांनी श्री. पेरे पाटील यांची भेट घेऊन विकासाला साहाय्य देण्याची अपेक्षा केली होती. त्यानुसार आज आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी इगतपुरीत भेट देऊन सरपंचांना मोलाचे मार्गदर्शन केले. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. माजी आमदार शिवराम झोले यावेळी म्हणाले की, आपल्या अलौकिक कार्याने गोरख बोडके यांनी राज्यभर नवा आदर्श निर्माण केला असून आतां श्री. पेरे पाटील यांच्या हातभाराने विकसित इगतपुरी तालुका निश्चितच उभा राहणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, राजकारण विरहित ग्रामविकास करण्यासाठी एकजूट अतिशय महत्वाची आहे. यासाठी माझ्या तालुक्यातील सर्व सरपंचांना आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तींचे सहाय्य मिळणार आहे. यापुढील विकासाला दिशा देण्यासाठी आजचा दिवस मैलाचा दगड ठरणार आहे. याप्रसंगी मुंढेगावचे सरपंच विनायक गतीर, माणिकखांबचे सरपंच शाम चव्हाण, बलायदुरीचे माजी सरपंच कैलास भगत,शेणवड बुद्रुकचे सरपंच कैलास कडू, वाकीचे सरपंच शिवनाथ काळे, मानवेढे सरपंच भाऊराव भागडे, पिंपळगाव भटाटा सरपंच बळीराम हिंदोळे, कावनईचे सरपंच गोपाळ पाटील, खादी ग्रामोद्योग संचालक भगीरथ भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर सरपंच आणि पदाधिकाऱ्यांशी भास्करराव पेरे पाटील यांनी दिलखुलास संवाद साधत मार्गदर्शन केले.

Similar Posts

error: Content is protected !!