इगतपुरीनामा न्यूज, दि. 23 ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्यातर्फे दातृत्वाच्या भावनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरोग्य किट वाटप सुरू आहे. दुर्गम भागासह गावोगावी जाऊन तिथल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी संबंधितांच्या कुटुंबीयांकडे औषधोपचारासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना बाधित व्यक्तींच्या घरातील व्यक्तींना आधार देत मायेने विचारपूस केली जात आहे. दिल्या जाणाऱ्या कोरोना मुक्ती किटमध्ये डाॅक्टरांकडुन मान्य असलेल्या गोळ्या वाटप केल्या जात आहेत. ह्या उपक्रमामुळे बहिरू मुळाणे यांचे तालुकाभर कौतुक होत आहे. स्वतःला गरिबांचे तारणहार असणारे नेतेमंडळी ऐन संकट काळात गायब झाल्याने गोरगरीब नागरिकांना बहिरू मुळाणे यांचा आधार लाभला आहे.
श्री. मुळाणे यांनी मागील वर्षी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात केली. त्यांच्या घरातील कोणीही उपाशी राहू नये. या उदात्त उद्देशाने दातृत्वाच्या भावनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मुळाणे यांनी मोठे काम उभे केले. त्यांच्याकडुन गोरगरिब कुटुंबियांना शिधावाटप करण्यात आला होता. वाढोली येथे आरोग्य किट वाटपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्र्यंबक तालुकाध्यक्ष बहीरू मुळाणे, सरपंच सिंधुताई आचारी, चेअरमन मनोहर महाले, पोलीस पाटील गोकुळ महाले, ग्रामपंचायत सदस्य शंकर आचारी, तुकाराम तांबडे, ग्रामसेवक युवराज ठाकरे आदी उपस्थित होते.