इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले २ सख्खे भाऊ पाण्यात बुडाले असल्याची घटना घडली आहे. आज ४ वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस आणि बचाव पथकाला पाचारण केले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे रा. आवळखेड असे बुडालेल्या युवकांची नावे समजली आहेत. आज सकाळी आवळखेड येथील काही युवक इगतपुरी तालुक्यातील देवळे गावाजवळ दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. भावाला वाचवत काठावर आणीत असतांना अचानक दोघेही बुडाल्याचे समजते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group