भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महिलांचे शोषण करणारा तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याचे इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय आहे. याअनुषंगाने विशेष तपास पथक इगतपुरी तालुक्यात आज दाखल झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील एका भोंदूबाबाच्या घरी भोंदू अशोक खरात नियमित येत असल्याची माहिती आहे. त्यानुसार तपास पथक गावी सर्वांगीण चौकशी करणार आहे. इथल्या एका भोंदूबाबाकडून अशोक खरातला गंडे दोरे, अंगठ्या वगैरे पुरवल्या जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह अशोक खरातच्या पैशातून या भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यात अनेक गावात व नाशिकमधील बऱ्याच ठिकाणी कोट्यवधी रुपयाच्या मालमत्ता घेतल्या गेल्याचा सुद्धा संशय आहे. धरण भागासह पर्यटन क्षेत्रातील गावांत सुद्धा अशोक खरात याने काही जमिनी समर्थकांच्या नावावर घेतल्या असाव्यात अशी चर्चा सुद्धा रंगली आहे. विशेष तपास पथकामार्फत याप्रकरणी भंडाफोड केला जाणार असल्याने इगतपुरी तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि स्थानिक भोंदूबाबाकडून कोणाचे शोषण झाले आहे का याचा सूक्ष्म शोध सुरु करण्यात आला आहे.
Related Posts
रस्त्यांच्या दुरुस्तीला टोलवाल्यांची “कुंभकर्णी” झोप ; मात्र टोल द्या “रोखठोक..! : महामार्गाच्या अवस्थेमुळे अपघात, वाहने नादुरुस्त, टायर फुटणे आदी घटना वाढल्या
इगतपुरीनामा न्यूज, दि. 20 मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे खड्ड्यांचे माहेरघर बनले आहे. अपघातांना कारणीभूत ठरणारे खड्डे लोकांच्या जीवाला घातक ठरू…
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात परिसर मुलाखती संपन्न
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिन्दी भाषेवर प्रभुत्व संपादन करून व्यवसाय व नोकरीच्या विविध संधी मिळविण्यासाठी प्रयत्न…
ऊर्जा फाउंडेशनच्या मदतीने गरुडेश्वर शाळेचा झाला कायापालट ; विविध कामांचे उदघाटन संपन्न
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – अंधेरी येथील ऊर्जा चॅरिटी फाउंडेशनच्या आर्थिक साहाय्याने गरुडेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्ती कामांचे उदघाटन…