इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
घोटीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्याने आज दुपारी पावणेदोन वाजता अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गावर थायसन कृप कंपनीजवळ ही घटना घडली. या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध महिला उपचारानंतर मृत झाली आहे. यासह खेड भैरव येथील दोघे बहिणभाऊ किरकोळ जखमी झाले आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना पाथर्डी फाटा नाशिक येथील वक्रतुंड रुग्णालयात दाखल केले आहे. MH 15 HR 6493 ह्या मोटारसायकलवरील पंकज ओंकार सूर्यवंशी वय 30, सीता ओंकार सूर्यवंशी वय १९ रा. खेड भैरव ता. इगतपुरी हे किरकोळ जखमी तर ताराबाई सुखदेव खैरनार वय 65 रा. तिसगाव ता. दिंडोरी ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होता. मात्र रात्री त्या मृत झाल्या.