इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोडाळे गांवात विनापरवानगी सप्ताह सोहळ्याचे आयोजन करुन १५० ते २०० नागरिकांची गर्दी जमवल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक निलेश मराठे यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनो रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणाने सर्व प्रकारच्या धार्मिक प्रकारच्या कार्यक्रमांना जिल्हाधिकारी यांनी आदेश काढुन बंदी घातली आहे. मात्र इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील कचरू वाळु गोऱ्हे व मच्छींद्र बोडके यांनी दि. २६ मार्च रोजी कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे माहीत असुन सुध्दा जिल्हाधिकारी यांचे नियम, अटी व शर्तीचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता सप्ताह सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करून १०० ते १५० नागरिकांची गर्दी जमवुन कोरोना संसर्ग जन्य रोग पसरविण्यासाठी हयगय करुन शासन आदेशाचा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group