उम्मीद बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने इगतपुरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या उम्मीद बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने इगतपुरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कुशेगाव व वैतरणा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गरजू विद्यार्थ्यांना एकूण १८ सायकलचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य, शैक्षणिक मार्गदर्शन करून बिस्कीट-केक देखील वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, संस्थेच्या अध्यक्षा नेहा भोईर, सहकारी रिया लिंबे, स्वरा देशमुख, परेश चौधरी, श्रुती, लौकिक, नेहा, मिनाक्षी, सुहास, योगेश, ज्योती चंद्रमोरे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!