इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन दिवसांपासून १६ वर स्थिर झाली आहे. रुग्ण बरे होण्याची आणि बाधित झालेल्या नव्या रुग्णांची संख्या सुद्धा समसमान पातळीवर राहत आहे. परिणामी कोरोनामुक्त तालुका होण्याचे स्वप्न पुढे ढकलले जात आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज १ रुग्णाने कोरोनावर मात केली. तर नव्या १ व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर इगतपुरी तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १६ वर स्थिर झालेली आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008