‘जीबीएस’ ला घाबरू नका. या आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचार कसा कराल? – डॉ. अविनाश गोरे

 लेखन – डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय नाशिक संपर्क – ७९७२४२६५८५.

गुलेन /गियान बारे सिन्ड्रोम हा आजार आपल्या केंद्रीय मज्जासंस्थेचा असून आपली इम्युनिटी जेंव्हा चुकीच्या पद्धतीने कार्य करते तेंव्हा होतो. शरीरातील आपली इम्युनिटी जेंव्हा आपल्याच चांगल्या पेशींवर हल्ला करते तेंव्हा अनेक आजार होऊ शकतात त्यांपैकी हा एक आजार आहे. ह्याचा प्रादुर्भाव पुण्याच्या ठराविक भागात झाला आहे. आपण घाबरून न जाता ह्या आजाराला लवकरात लवकर कसे ओळखायचे हे महत्वाचे आहे. ह्या आजाराला घाबरून जाऊ नका, हा आजार पूर्णपणे बरा होतो.हा आजार होण्याचे असे विशिष्ट वय नसून तो कुणालाही होऊ शकतो. परंतु १५ ते २५ वयोगट आणि वयोवृद्धांमध्ये आणि बालकांमध्ये देखील हा आढळतो. हा आजार होण्यामागे आपल्या इम्युनिटी मधील बिघाड कारणीभूत ठरतो. ह्या आजारात लोकांची इम्युनिटी ही अधिकच गरजेपेक्षा जास्त क्षमतेने कार्य करत होत असल्याचे दिसून येते. जेंव्हा एखाद्या व्यक्तीला साधी सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या, होतात व त्यानंतर उपचार घेऊन रुग्ण पूर्ण बरा होतो. पण नंतर तापासह वरील आजाराच्या २-३ आठवड्यानंतर मात्र रुग्णाला हा आजार होऊ शकतो. पायांत अचानक अशक्तपणा, मुंग्या येणे जाणवते. हळूहळू किंवा लगेचच रुग्णाला खालून वर हा अशक्तपणा, मुंग्या येणे, स्नायूंमध्ये कमजोरपणा जाणवून रुग्ण पॅरेलसीसमध्ये देखील जाऊ शकतो. आपल्या श्वसन संस्थेच्या स्नायूंचा पॅरेलसीस घातक म्हणजे रुग्णाला व्हेंटिलेटरवर नेण्यास कारणीभूत ठरू शकतो. आपल्या स्नायूंची लवचिकता नाहीशी होते. आपल्या श्वसन संस्थेला अथवा आपल्या पोट-आतड्याना बाधित करणारे विषाणू अथवा जिवाणू हे कारणीभूत ठरतात. इन्फ्लुएन्झा, कोविड, लसीकरणानंतर देखील GBS आढळण्याचे प्रमाण काही ठिकाणी दिसून आले असले तरी सद्यस्थितीत ह्यांची शक्यता कमी वाटते. आपल्या इम्युनिटी मधील बिघाड झाल्याने इन्फेक्शनमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीज ह्या आपल्या Peripheral Nerves च्या मायलीन शिथ, Axons, Neurons, dendrites वर हल्ला करतात. निदान – पाठीच्या मणक्यातुन पाण्याची तपासणीमध्ये आपल्याला प्रोटिन्सचे प्रमाण वाढलेले दिसते. पेशी त्यामानाने वाढलेल्या नसतात. बाकी कारणे तपासून घेण्यासाठी एक एमआरआय देखील करून घ्यायला हवा. 

Nerve-Conduction-Velocity (NCV) Study, आपल्या nervesचे कंडक्शन कसे आहे हे तपासण्याची टेस्ट ह्यामध्ये देखील दोष आढळतो. आपले न्यूरॉन्स ह्यांना सिग्नल न भेटल्याचे ह्या तपासणीतून दिसून येते. ECG : वर आपल्याला arrythmia दिसू शकतात. Single Breath Counts हे आपण सलग १ पासून १५ पर्यंत आकडे बोलू शकत नाहीत जर पंधरा पेक्षा कमी आकडे बोलताना आपल्याला श्वास घेण्यास त्रास झाला तर या आजाराची शक्यता बळावते. श्वासोश्वासाची गती ३० पेक्षा वाढते, ऑक्सिजन पातळी कमी होते. गिळायला त्रास, गिळता न येणे, कफ करता न येणे, तोंडात लाळ जमा होणे अशी आपल्याला बाधणारी लक्षणे दिसून येतात. उपचार – IVIG , intravenous Immunoglobulin आपण देऊ शकतो. हे आपल्या शरीरातील जे antibodies जे आपल्याच mylien sheath वर हल्ला करतात त्यांना neutralize करण्यास मदत करतात. आजार जेंव्हा वाढायची लक्षणे दिसतात तेंव्हा हे लवकरात लवकर द्यायला हवे. औषधी महागडी असतात. Plasma Exchange/Plasmapheresis हे आपले रक्त/Plasma बदलवून जुन्या antibodies ज्या की विरुद्ध काम करतात त्यांना बदलवून नव्याने कार्य करत असतात. Steroids चा उपयोग इथे अजून Proove झालेला आढळून येत नाही. कमी आजार असल्यास तो आपोआप बरा होतो. कधीकधी आपल्याला रुग्णाला Ventilator वर ठेवावे लागू शकते. पूर्ण बरा होण्यास ४ ते ६ महिने लागतात. Gbs च्या आजारानंतर आपल्याला Physiotherapy/भौतिक उपचार करणे अत्यावश्यक असते. त्यानुसार आपल्याला आपल्या स्नायूंचा अशक्तपणा/Paralysis साठी पूर्ववत आणण्यासाठी त्याची गरज असते. प्रतिबंध /काळजी कशी घ्याल? – पाणी स्वच्छ उकळून प्यावे. स्वच्छ जेवण हवे. फळे,भाज्या, स्वच्छ धुवुनच खावे. घरचे जेवण करावे. बाहेरचे अस्वच्छ जेवण करू नये. स्वतःची स्वच्छता, हात स्वच्छ धुणे फार महत्वाचे आहे. कुठलेही इन्फेक्शन होऊ देऊ नये. हा आजार autoimmune असल्याने तो संसर्गजन्य नाही. माणसाच्या इम्युनिटीमध्ये बिघाड झाल्याने होतो. आजाराची लक्षणे ओळखणे, वेळीच जाऊन दवाखान्यात दाखवणे, गंभीर लक्षणे असल्यास वेळीच IVIG ची ट्रीटमेंट सुरू करावी. स्नायूंमध्ये अशक्तपणा, लुळेपणा, मुंग्या येणे ह्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे. लहान मुलांमध्ये अशीच वर सांगितल्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात उपचार देखील तसाच आहे.

Similar Posts

error: Content is protected !!